भोसरी हादरलं! धारदार हत्याराने वार करून तरुणाचा खून

266

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – धारदार हत्याराने वार करून तरुणाचा खून केला. ही घटना सोमवारी (दि. 26) मध्यरात्री सव्वा एक ते पाच वाजताच्या कालावधीत लांडगेआळी भोसरी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ घडली.

अमन सुरेश डांगळे (वय 27, रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाची पत्नी सोनाली अमन डांगळे (वय 25) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी यांचे पती अमन डांगळे त्यांच्या दुचाकीवरून विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ, लांडगेआळी, भोसरी येथे गेले होते. सोमवारी मध्यरात्री सव्वा एक ते पाच वाजताच्या कालावधीत अज्ञातांनी अज्ञात कारणावरून अमन यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूला आणि हातावर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. त्यात अमन यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलिसांना अमन यांची पल्सर दुचाकी आणि चप्पल आढळून आली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार अनैतिक संबंधातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare