भोसरी विधानसभा भाजप युवती आघाडीच्या कार्याध्याक्ष पदी प्राजक्ता ढोके

124

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – घरकुल चिखली येथील प्राजक्ता ढोके यांची भोसरी विधानसभा भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या कार्याध्याक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्राजक्ता ढोके यांना निवडचे पत्र देण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम उपस्थित होत्या.