भोसरी येथील गोविंद बावणे यांचे निधन

297

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – भोसरीतील कृष्णानगर येथील गोविंद तुकारामजी बावणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते.

त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, चार नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण बावणे यांचे ते वडील होते. शिवाय कृष्णानगर सचिन जेष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष होते.