भोसरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; माजी नगरसेवकाच्या मुलासह सात जणांना अटक

1087

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – भोसरी पोलिसांनी कासारवाडी येथे सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये एका माजी नगरसेवकाच्या मुलासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 17) सायंकाळी साडेसात वाजता करण्यात आली.

कुणाल दशरथ लांडगे (वय 36, रा. कासारवाडी), अप्पाशा इरप्पा शिवशरण (वय 42, रा. शितोळेनगर, सांगवी), शंकर खंडू दूनघव (वय 49, रा. भोसरी), किशोर नामदेव बाबर (वय 52, रा. कासारवाडी), गणेश भीमराव घोडे (वय 38, रा. लांडेवाडी), देवराज धोंडीबा पाचंगे (वय 35, रा. भोसरी), मुरली भिवाजी उजगरे (वय 51, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई सागर यशवंत भोसले यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील हॉटेल सर्जाच्या मागील बाजूला असलेल्या कौलारू घरात आरोपी कुणाल तीनपत्ती जुगार क्लब चालवत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून 36 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सात जणांना अटक केली. त्यानंतर सर्व आरोपींना पोलिसांनी सीआरपीसी कलम 41 (अ) 1 नुसार नोटीस समजपत्र देऊन सोडून दिले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare