भोसरी, निगडी, हिंजवडीमधून तीन महागड्या दुचाकी चोरीला

53

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – भोसरी, निगडी आणि हिंजवडी परिसरातून एक लाख 25 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 29) अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सत्यमप्रकाश योगेंद्र माल (वय 27, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माल यांनी त्यांची 80 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एच आर 1192 ही दुचाकी 26 जून रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकीचे लॉक तोडून चोरून नेली. 27 जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दिलीप राजाराम भोसले (वय 59, रा. बी जे कॉर्नर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची एम एच 14 / ई एल 6139 ही दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये 21 जून रोजी पार्क केली अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. 22 जून रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
आरती प्रकाश वैदय (वय 25, रा. लक्ष्मी चौक हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 35 / व्ही 7276) राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क करून लॉकडाऊन असल्यामुळे 20 मार्च रोजी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी गोंदिया येथे गेल्या. त्यांचे काम सुरु झाल्याने ३ जून रोजी त्या परत हिंजवडी येथे आल्या. त्यावेळी त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, गावाहून आल्यानंतर 15 दिवस होम क्वारंटाईन केल्यामुळे त्यांनी त्यांच्या दुचाकीचा शोध घेतला नाही. त्यानंतर दुचाकीचा शोध घेतला. मात्र, दुचाकी मिळून आली नाही म्हणून 29 जून रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

WhatsAppShare