भोसरी, निगडी परिसरातून चार वाहने चोरीला

14

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – भोसरी परिसरातून दोन तर एमआयडीसी भोसरी आणि निगडी परिसरातून प्रत्येक एक असे एकूण चार वाहनचोरीचे गुन्हे गुरुवारी (दि. 22) दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद केली आहे.

लक्ष्मी नारायण भवरलाल जागिड (वय 24, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 12 / जी डी 9181) अज्ञात चोरट्याने इंद्रायणीनगर भोसरी येथील हॉटेल हवेली येथून चोरून नेली आहे. तर श्रीकृष्ण भगवान महाजन (वय 39, रा. संत ज्ञानेश्वर नगर, महाराष्ट्र चौंक, आळंदी रोड, भोसरी) यांची 10 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ए जे 8621) अज्ञात चोरट्याने घरासमोरून चोरून नेली. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पावन ज्ञानेश्वर काळे (वय 22, रा. दिघी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळे यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ई जी 6668) अज्ञात चोरट्यांनी चिखली येथून चोरून नेली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

अभिजित सीताराम शिंदे (वय 29, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांची 40 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी के 0706) अज्ञात चोरट्यांनी 20 ऑक्टोबर रोजी भेळ चौक, प्राधिकरण निगडी येथून चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare