भोसरी एमआयडीसी मधील दोन कंपन्यांमध्ये चोरी

127

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – भोसरी एमआयडीसी मधील इंडिया फोर्स अँड ड्रॉप स्टेम्पिंग्ज लिमिटेड आणि सुयश इंजिनिअरिंग या दोन कंपन्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. सुमारे पावणे दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असून याप्रकरणी बुधवारी (दि. 12) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इंडिया फोर्स अँड ड्रॉप स्टेम्पिंग्ज लिमिटेड कंपनीतील चोरी प्रकरणी प्रल्हाद सुलाभराव सांडभोर (वय 53, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. सांडभोर हे इंडिया फोर्स अँड ड्रॉप स्टेम्पिंग्ज लिमिटेड कंपनीत नोकरी करतात. 19 सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते चार वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या आवारातून 78 हजारांचे रॉ मटेरियल चोरून नेले.

सुयश इंजिनिअरिंग या कंपनीतील चोरी प्रकरणी अमेय अविनाश शेवाळे (वय 27, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. 11) सायंकाळी सहा ते बुधवारी (दि. 12) सकाळी साडेदहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या कंपनीतून एक लाख 28 हजार रुपये किमतीचे तांब्याचे लहान 600 पिस चोरून नेले. तसेच ओम इंजिनिअरिंग नावाच्या शॉप मधून 68 हजार रुपये किमतीचे समान चोरी झाले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत