भोसरी एमआयडीसी मधील कंपनीत एक लाखाची चोरी

73

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – भोसरी एमआयडीसी परिसरातील स्पेक्टरम मेक टेक्नॉलॉजीस कंपनीत अज्ञात चोरट्यांनी चोरी करून एक लाख पाच हजार रुपयांचे मटेरियल चोरून नेले. ही घटना एक जून रोजी मध्यरात्री दोन ते चार वाजताच्या सुमारास घडली.

रवीकुमार नागेश्वरराव येडीडा (वय ४०, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. १६) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी मधील स्पेक्टरम मेक टेक्नॉलॉजीस या कंपनीच्या पाठीमागील बाजूचा पत्रा काढून अज्ञात चोरट्यांनी एक लाख पाच हजार रुपये किमतीचे तीन मीटर लांबीचे स्टीलनेस बार, स्टेनलेस शीट्स चोरून नेल्या. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.