भोसरी एमआयडीसीत व्यावसायिकाचा मोबाईल हिसकावला; आरोपींना अटक

488

भोसरी, दि. ३१ (पीसीबी) –  मोबाईलवरील मॅसेज वाचत पायी जाणाऱ्या एका व्यावसायिकाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून चोरु नेला. ही घटना बुधवारी (दि.२९) दुपारी चारच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील अनुकुल कंपनीसमोर घडली.

शरद शांताराम खवणेकर (वय २४, रा. आळंदी-चाकण रोड, आळंदी) असे मोबाईल हिसकावण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी त्यानुसार शुभम नितीन काळभोर (वय १८) आणि अमर राम पोटभरे (वय २०, दोघेही रा.  भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खवणेकर बुधवारी दुपारी भोसरी एमआयडीसी येथील अनुकुल कंपनी समोरून मोबाईलमधील मॅसेज पाहत पायी जात होते. यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या  शुभम आणि अमर या दोघांनी खवणेकर यांच्या हातातील ओपो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुण चोरुन नेला. पोलिसांनी अमर आणि शुभम या दोघांना अटक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.