भोसरीमध्ये कंपनीत जबदस्तीने घुसून चोरट्यांनी केला १६ हजारांचा माल लंपास

37

भोसरी एमआयडीसी येथे रात्रीच्या वेळेस एका खाजगी कंपनीत तीन अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने घुसून १६ हजारांचा माल लंपास केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१०) रात्री उशीरा तीनच्‌या सुमारास भोसरी एमआयडीसी सेक्टर नं. ७/१०८ येथील साई एंटरप्रायजेस या कंपनीत घडली.

याप्रकरणी कंपनीतील ऑपरेटर राकेश चौधरी (वय २२, रा. भोसरी) याने तीन अनोळखी इसमांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.१०) रात्री उशीरा तीनच्‌या सुमारास फिर्यादी राकेश चौधरी आणि त्याचा सहकारी बबलू भोसरी एमआयडीसी सेक्टर नं. ७/१०८ येथे साई एंटरप्रायजेस या कंपनीत काम करत होता. इतक्यात दुचाकीवरुन आलेले तीन अनोळखी इसम कंपनीत जबदस्तीने शिरले व कंपनीतील कॉपर वायर, पट्टया आणि राकेश चौधरी याचा एक मोबाईल असा एकूण १६ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.