भोसरीत सौचास निघालेल्या महिलांची छेड; जाब विचारणाऱ्या पतीच्या डोक्यात टोळक्यांनी घातला दगड

245

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – सौचास निघालेल्या चौघा महिलांची चार आरोपींनी अश्लील भाषेत बोलून छेड काढली. तसेच याचा जाब विचारणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून तिच्या पतीच्या डोक्यात दगड मारला आणि घरातील साहित्यांचे नुकसान केले. ही घटना रविवारी (दि.७) रात्री नऊच्या सुमारास चक्रपाणी वसाहत, देवकर वस्तीजवळील मोकळ्या जागेत घडली.

याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय माने, रोहन, राम पुजारी आणि निखील आदग या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी ४५ वर्षीय महिला त्यांच्या दोन मुली आणि शेजारील एक महिला सौचास चालल्या होत्या. यावेळी रस्त्यात उभे असलेले टवाळखोर चौघा आरोपींनी अश्लील भाषेत बोलून महिलांची छेड काढली. तसेच फिर्यादी महिलेच्या दोन्ही मुलींकडे पाहून, “तुम्ही दोघी आमच्या सोबत आल्या नाही तर कोयत्याने मारुन टाकीन”, अशी धमकी दिली. त्यानंतर जाब विचारल्याच्या कारणावरुन फिर्यादी सोबतील महिलेच्या घरात घुसून तीचे पती देवीसींग यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. तसेच घरातील भांड्यांचे नुकसान केले. पोलिसांनी आरोपी निखील याला अटक केली आहे. तर इतर तिघा आरोपींचा शोध घेत आहेत.