भोसरीत विवाहित शिक्षिकेच्या व्हॉट्अॅप क्रमांकावर अज्ञाताने पाठवले अश्लील मेसेज; गुन्हा दाखल

177

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – भोसरीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या विवाहित महिलेच्या व्हॉट्अॅप क्रमांकावर अश्लील मेसेज पाठवल्याने अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.६) दुपारी अडीचच्या सुमारास भोसरीतील शाळेत घडली.