भोसरीत महिलेला मारहाण करुन पाच लाखांच्या खंडणीची मागणी

171

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – घरात घुसून एका महिलेला दुसऱ्या एका महिलेने मारहाण केली. तसेच त्या महिलेकडे तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागीतली. हि धक्कादायक घटना भोसरी दिघी रस्ता येथील अरविंद काळे यांच्या खोलीत घडली.

याप्रकरणी माधुरी गजानन धोटे (वय ३०, रा. कृष्ण मंदिरसमोर, आळंदीरोड, भोसरी) यांनी शनिवारी (दि.२० जुलै) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अर्चना जळमकर (रा. नुरमोहल्ला कॉलनी, दिघी रोड, भोसरी) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.८ जून) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी माधुरी या त्यांच्या घरी होत्या. यावेळी आरोपी अर्चना या त्यांच्या घरात घुसल्या. तसेच शिवीगाळ करुन दमदाटी करत हाताने मारहाण केली. आणि माधुरी यांच्याकडे पॉच लाखांची खंडणी मागितली. अर्चना यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक हंडाळ तपास करत आहेत.