भोसरीत महावितरणच्या कार्यालयासमोर वीज दरवाढीविरोधात लघुउद्योग संघटनेच्या वतीने आंदोलन

58

पिंपरी, ७ (पीसीबी) – महावितरणने प्रस्तावित वीज दरवाढ त्वरित मागे घ्यावी. या मागणीसाठी पिंपरी- चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयासमोर संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले.

यावेळी वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी जयंत कड, प्रमोद राणे, निस्सार सुतार, संजय सातव, संजय ववले, विनोद नाणेकर, नितीन बनकर, प्रविण लोंढे, हर्षल थोरवे, संजय आहेर, दिपक फल्ले, दिपक मोडवे, शिवाजी साखरे, विनोद मित्तल, नवनाथ वायाळ, भरत नरवडे, अतुल कंक, अतुल ईनामदार, सुनिल शिंदे, शांताराम पिसाळ, सचिन आदक, महादेव कवितके, अशोक अगरवाल, सुरेश जपे, शिवाजी पाटील, प्रकाश ढमाले, बशीर तरसगार, गणेश माळी, चांगदेव कोलते, शशिकांत सराफ, सुरेश जरे, हंबीरराव आवटे, संजय तोरखाडे, सुहास केसकर, विजय भीलवाडे, रमेश ढाके, प्रभाकर धनोकार, मोहिनी जगताप, अशोक पाटील आदींसह शेकडो लघुउद्योजक उपस्थित होते.

सत्यशोधन समिती व आयआयटी मुंबई यांचा अहवाल आल्यानंतर फेर आढावा याचिकेच्या तपासणीच्या वेळी खरा वीज वापर जाहीर करावा. मगच आयोगाने वीज दरवाढीचा निर्णय घेण्यात यावा. तसेच प्रस्तावित वीज दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास पुढील कालावधीत आंदोलन आणखी तीव्र करु. वेळप्रंसगी कामबंद करु असा इशारा पिंपरी चिंचवड लघुउदयोग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांनी दिला.