भोसरीत बेकायदेशिररित्या हत्यार बाळगणाऱ्या तरूणाला अटक  

1274

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – बेकायदेशिररित्या हत्यार घेऊन फिरत असलेल्या तरूणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस असा एकूण २० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

विकास मनोज साके (वय २३, रा. झेंडेचाळ, देहूगाव, मुळ – सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास हा स्वतःजवळ हत्याऱ बाळगून इंद्रायणीनगरमधीळ ई प्रभागाच्या पाठीमागिल सार्वजनिक रस्त्यावर आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विकासला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि काडतुस आढळून आले. भोसरी पोलिस तपास करत आहेत.