भोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली

297

भोसरी, दि. २० (पीसीबी) – पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. ही घटना गुरुवार (दि.९) भोसरीतील इंद्रायणीनगर येथे असलेल्या लक्षदिप सोसायटी येथे घडली.

याप्रकरणी दुचाकीचे मालक विनोद रविंद्र शिंदे (वय ३२, रा. एकतानगर, चाकण) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद शिंदे हे गुरुवारी भोसरी इंद्रायणीनगर येथील लक्षदिप सोसायटीमध्ये कामा निमित्त आले होते. त्यांनी त्याची दुचाकी सोसायटीजवळ लावली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरुन नेली. भोसरी पोलिस तपास करत आहेत.