भोसरीत पाऊण लाखाची घरफोडी

8

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – चक्रपाणी वसाहत भोसरी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 70 हजार 800 रुपयांचे दागिने, रोख रक्कम आणि गृहउपयोगी वस्तू चोरून नेल्या. हा प्रकार 21 जुलै ते 22 ऑक्टोबर या कालावधीत घडला.

ज्योती सोपान शिंदे (वय 30, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 22) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांचे घर 21 जुलै रात्री दहा ते 22 ऑक्टोबर सकाळी साडेसहा या कालावधीत बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातून 70 हजार 800 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही, गॅस सिलेंडर, रेग्युलेटर आणि शेगडी असे गृहउपयोगी साहित्य चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare