भोसरीत दुचाकीस्वाराला जबरमारहाण करुन तिघे हल्लेखोर दुचाकी घेऊन पसार

182

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – पॅग्गोगाडीतून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी एका दुचाकीस्वाराला आडवून हेल्मेट व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करुन त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन पसार झाले आहेत. ही घटना मंगळवार (दि.१०) सकाळी सातच्या सुमारास भोसरीतील गोडाऊन चौक येथे घडली.
प्रशांत पिरंगुटे (वय ३१, रा. चिबळी, ता.हवेली) असे जबर मारहाण झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याने तीन अनओळखी इसमांविरोधात भोसरीत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास प्रशांत पिरंगुटे हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन भोसरीतील गोडाऊन चौक येथून जात होता. यावेळी पॅग्गोगाडीतून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी प्रशांत याला आडवून हेल्मेट आणि लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या ताब्यातील दुचाकी घेऊन तिघे हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात प्रशांतच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून त्याचे दोन दात तुटले आहेत. भोसरी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.