दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन एका  दुचाकीस्वाराला तिघांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२९) सायंकाळी पाचच्या सुमारास भोसरी येथील संजय गांधी नगर येथे घडला.

संतोष ठोकळ (वय २५), विशाल कांबळे (वय २६), शुभम खरात (वय २२) असे मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जखमी दुचाकीस्वार विकास सर्जेराव इंगळे (वय ३५, रा. संजय गांधी नगर, भोसरी) यांनी  त्यांच्या विरुध्द भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास इंगळे हे गुरुवारी (दि.२९) सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरुन भोसरी येथील संजय गांधी नगर येथे आपल्या घराकडे जात होते. रस्त्याने जात असताना त्यांच्या दुचाकीचा धक्का आरोपींना लागला. यावरून तिघा आरोपींनी विकास यांचा पाठलाग केला व त्यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक  मारला. तर इतर दोन आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये विकास इंगळे गंभीर जखमी झाले आहेत.  आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.