भोसरीत तडीपार सराईत गुन्हेगाराने आदेशाने उल्लंधन केल्याप्रकरणी १० हजाराचा दंड

507

भोसरी, दि. १ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराने आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हेगाराला भोसरी, एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

स्वप्निल ऊर्फ बाळू नामदेव शेलार (वय २६, रा. दत्तनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल याला २६ ऑक्टोबर २०१७ रोजी दीड वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी शहरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  १० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.