भोसरीत टेंडर मिळवून देतो सांगून ७२ लाखांची फसवणूक

148

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – टेंडर मिळवून देतो असे सांगून एका ठगाने तब्बल ७२ लाख २५ हजार रुपयांनी आर्थीक फसवणू केली आहे. ही फसवणूक २०१४ ते बुधवार (दि.६) जून दरम्यान करण्यात भोसरीतील बारामती सहकारी बँक लिमिटेड येथे करण्यात आली.

विनायक नरेंद्र सुर्वे (वय ३०, रा. गोकुळदासवाडी, तनपुरे खोपट, ठाणे) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आसून याप्रकरणी संजय सुर्वे (वय ४५, पिंपळे-गुरव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक सुर्वे यांनी फिर्यादी संजय सुर्वे आणि त्यांच्या इतर सहकार्यांना “माझी मोठ्या राजकीय नेत्यांशी ओळख आहे, तुम्हाला टेंडर मिळवून देतो असे सांगून फिर्यादी आणि त्यांच्या सहकार्यांचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी असे एकूण ७२ लाख २५ हजार रुपये गोळा करुन परत दिलेच नाही. आरोपी विनायक याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.