भोसरीत खाजगी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; आरोपी बसचालक बससह फरार

862

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – कंपनीतील कर्मचाऱ्यांना ने-आण करणाऱ्या खाजगी बसने दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना  मंगळवारी (दि.११) दुपारी साडेबाराच्या सुमारास भोसरी धावडे वस्तीतील लोंढे बिल्डींग समोरील मोकळ्या जागेत घडली.

दिपक खळगे (वय २५, रा. लोंढे बिल्डींग, शिवगणेश कॉलनी, धावडेवस्ती, भोसरी) असे बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत दिपक याचा भाऊ सचिन खळगे (वय २८, लोंढे बिल्डींग, शिवगणेश कॉलनी, धावडेवस्ती, भोसरी) याने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी सचिन यांचा भाऊ दिपक याला एका पांढऱ्या रंगाच्या बसने धावडे वस्तीतील लोंढे बिल्डींग समोरील मोकळ्या जागेत जोरदार धडक दिली. यामध्ये दिपक याचा जागीच मृत्यू झाला तर बसचालक बससह फरार झाला. ती बस कंपनीतील कामगारांना ने-आण करणारी बस असल्याचे सचिन याचे म्हणने आहे. भोसरी पोलीस आरोपी बसचालकाचा शोध घेत आहेत.