भोसरीत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून १९ महिलांची फसवणुक

201

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ठगाने १९ महिलांकडून प्रत्येकी १०५० रुपये घेऊन एकूण १९ हजार ९५० रुपयांची फसवणुक केली. ही घटना भोसरी येथे घडली.

याप्रकरणी आनुसया रामा बाबरे (वय ४६, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.१३) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, उमेश वासुदेव वाघमारे (वय ३८, रा. वल्लभनगर, पिंपरी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१९ या कालावधीत आरोपी उमेश वाघमारे याने फिर्यादी आनुसया यांच्यासह एकूण १९ महिलांना त्याची पिंपरी, वल्लभनगर येथील भारतीय महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येथे ओळख असून तुम्हा कर्ज मिळवून देतो असे सांगितले. तसेच प्रत्येक महिलेकडून १०५० रुपये असे एकूण १९ हजार ९५० रुपये गोळे केले. आणि कोणालाही कर्ज न देता ते पैसे खर्च करुन महिलांची फसवणुक केली. याप्रकरणी उमेश विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरनार तपास करत आहेत.