भोसरीत अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

287

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – ‘चलो, तुम्हे चिकन खाने को देता हू’ असे म्हणून एका अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ९) रात्री साडेनऊच्या सुमारास इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यानुसार, ननकु श्रीविलास सिंह (वय २०, रा. भोसरी. मूळ रा. फतेहपूर, उत्तरप्रदेश) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नराधम आरोपी ननकु याने चिमुकलीला ‘चलो, तुम्हे चिकन खाने को देता हू’ असे म्हणून घरातून घेऊन गेला. इंद्रायणी नगरमधील अॅरिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या मागे नेऊन तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार चिमुरडीच्या वडिलांना समजताच त्यांनी पोलीस धाव घेतली. पोलिसांनी आरोपी ननकु याला अटक केली असून त्याच्यावर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.