भोसरी येथील सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करुन येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग केल्या प्रकरणी पोलीसांनी अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडला.

गौसुद्दीन रजाक अत्तार (वय २०, रा. बालाजी नगर झोपडपट्टी, भोसरी) असे सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला भोसरी एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भाऊसाहेब पाटील (वय ३५, रा. भोसरी, पुणे) यांनी  भोसरी एमआयडीसी पोलीसात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौसुद्दीन रजाक अत्तार गुरुवारी सायंकाळी हॉटेल थर्माईस जवळ दारू पिऊन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठमोठ्याने आरडोओरडा करुन शिवीगाळ करीत होता. यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होता होता. त्याला तेथे उपस्थित काही नागरिकांनी समजवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र तो कोणचेच काही एक अयकत नव्हता. यामुळे काही अनुचीत प्रकार घडूनये म्हणून याप्रकाराची माहिती भाऊसाहेब पाटील यांनी  भोसरी एमआयडीसी पोलीसांना दिली. यानंतर पोलीसांनी गौसुद्दीन याला तातकाळ अटक केली. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.