भोसरीतील साईकृपा हॉटेलमध्ये चोरी करताना दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद

114

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – भोसरी एमआयडीसी येथील जे ब्लॉक क्वालिटी आईस्क्रिम जवळील  साईकृपा हॉटेलमध्ये चोरी करताना दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. हा प्रकार आज (शनिवारी) पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घडला. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

चोरट्यांनी हॉटेलच्या छतावरून आतमध्ये प्रवेश केला. त्यांनी काऊंटरमधील गल्ल्यातील किरकोळ रक्कम, शीतपेयांच्या १० बाटल्या, कामगार चंद्रभान सिंह (वय. ३०) यांचे टायटन कंपनीचे ८०० रूपये किंमतींचे घड्याळ चोरून नेले.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारे भोसरी एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.