भोसरीतील समर्थ मोबाईल दुकान चोरटयांनी फोडले; 21 मोबाईलसह टीव्ही चोरीला

71

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी जय महाराष्ट्र चौक, भोसरी येथील समर्थ मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक हे दुकान फोडले. दुकानातून पावणे सहा लाख रुपये किमतीचे 21 मोबाईल आणि एक टीव्ही चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री आठ ते शनिवारी (दि. 15) सकाळी सव्वादहा या कालावधीत घडली.

विशाल कुंडलिक टोके (वय 26, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टोके यांचे भोसरी येथील जय महाराष्ट्र चौकात समर्थ मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक या नावाचे दुकान आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून सात विवो, चार अॅपल आणि 10 ओपो कंपनीचे एकूण 21 मोबाईल फोन तसेच एक टीव्ही असा एकूण पाच लाख 71 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक रवी भवारी तपास करीत आहेत.