भोसरीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना

524

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – भोसरी येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी  उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमपी  बस आणि एसटी बस मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आले. तर  वाहतुकीला अडथळे ठरणारे सर्व  अडथळे हटवण्यात आले.

यामुळे भोसरी, चाकण ,राजगुरुनगर, नाशिक,  यामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना  वाहतूक कोंडीतून  दिलासा मिळाला.  पोलिसांनी केलेल्या या उपाययोजना कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी होत आहे. तर नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.