भोसरीतील यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दहिहंडी उत्साहात साजरी

238

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवकाते, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते, शिक्षक आदी उपस्थित होते.

विद्यार्थांनी गो..गो गोविंदा, गोपाळा-देवकीनंदन गोपाळा, आला रे आला गोविंदा आला या गाण्यांच्या तालावर थरावर थर रचून दंहिहंडी फोडली. यावेळी १ ते १० वी इयत्तेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दहिहंडी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.