भोसरीतील मानाच्या गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप

159

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – प्रत्येक वर्षी दहाव्या दिवशी भोसरीतील मानाच्या गणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन पार पडते. यंदाच्या वर्षी भोसरीतील मंडळ आणि त्यांनी विसर्जना दरम्यान सादर केलेले देखावे अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक संदेश देणारे होते.

गणपती मंडळ आणि त्यांनी मिरवणुकी दरम्यान सादर केलेले काही देखावे पुढील प्रमाणे:

नव महाराष्ट्र मित्र मंडळ, लांडेवाडी – सुंदर फुलांचा त्रीशुलरथ

फुगे माने तालीम मंडळ, भोसरी गावठाण – इस्रो आणि फुलांचा सुंदर असा गजरथ

श्रीराम मित्र मंडळ – मखमली फुलांचा रथ

लांडगे लिंबाची तालीम मित्रमंडळ – फुलांची आरास

यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. काहींनी आनंदात तर काहींनी भावपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप दिला.