भोसरीतील बंगल्यात साडेचार लाखांची चोरी

113

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – बंद बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीच्या दरवाजाची काच तोडून कंपाटात ठेवलेले सोन्या-चांदिचे दागिने आणि रोख असा ४ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना मंगळवार (दि.१४) सायंकाळी पाच ते गुरुवार (दि.१६) या दरम्यान भोसरी इंद्रायणीनगर येथील महाराष्ट्र कॉलनीतील लक्ष्मीकुबेर बंगल्यात घडली.

याप्रकरणी शांताराम धोंडिबा चोरघे (वय ६५, रा. लक्ष्मीकुबेर बंगला, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शांताराम यांचा बंगला कुलुप लावून बंद असताना मंगळवार (दि.१४) सायंकाळी पाच ते गुरुवार (दि.१६) या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीच्या दरवाजाची काच तोडून आत प्रवेश केला. तसेच बेडरुम मधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदिचे दागिने आणि रोख असा ४ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. भोसरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.