भोसरीतील उड्डाणपुलाखालील बंद कारमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

3601

भोसरी, दि. २ (पीसीबी) – भोसरी येथील राजमाता जीजाऊ उड्डाण पुलाखाली असलेल्या एका बंद कारमध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (रविवार) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.

मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी पाचच्या सुमारास भोसरी येथील राजमाता जीजाऊ उड्डाण पुलाखालील बंद पडलेल्या एका कारमध्ये अज्ञात इमाचा मृत आढळा. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असता मयत इसम हा वेडसाळ असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. मयत इसम रोज जेवण केल्यानंतर या कारमध्ये झोपत होता. मात्र त्या कारमधून उग्र वास येऊन लागल्याने. याबाबतची माहिती भोसरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मयत इसमाचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिक तपास करत आहेत.