भोसरीतील इंद्रायणीनगर येथे दोन गटात हाणामारी

479

भोसरी, दि. २ (पीसीबी) – गाडीची धडक लागल्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. ही घटना काल (रविवारी) सायंकाळच्या सुमारास भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरात घडली. यामध्ये किरकोळ जखमी झालेल्या दोघांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात आणले असता तेथेही दोन गटात पुन्हा हाणामारी झाली. पोलिसांनी दोन्ही गटाला शांत केले असून जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोघेही किरकोळ जखमी आहेत. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्ंयान, काल (रविवारी) भोसरी पोलिस तपास गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. भोसरी पोलिस तपास करत आहेत.