भोसरीतील आदिनाथनगरमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड; आठ दिवसांत दुसरी घटना

0
598

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – भोसरीतील आदिनाथनगरमध्ये रविवारी रात्री पुन्हा आठ गाड्यांची तोडफोड करण्यात आली. सोमवारी (दि. १८) सकाळी ही घटना उघडकीस आली. आदिनाथनगरमध्येआठ दिवसांपूर्वीही वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पुन्हा याच भागात वाहन तोडफोडीची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्यावर्षभरांपासून सर्वसामान्यांच्या वाहनांची सातत्याने तोडफोड केली जात असून, अशा घटनांना आळा घालण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले आहे.

भोसरीतील आदिनाथनगर भागात आठ दिवसांपूर्वी दहा ते बारा दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. दोन गटातील भांडणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितलेहोते. वाहनांची तोडफोड केलेल्या काहींना भोसरी पोलिसांनी अटकही केली होती. परंतु, अवघ्या आठच दिवसांत याच भागातील वाहनांची पुन्हा तोडफोड करण्यात आली आहे.

रविवारी मध्यरात्री किंवा सोमवारी पहाटे या वाहनांची तोडफोड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आदिनाथनगरमध्ये दुसऱ्यांदा वाहनांची तोडफोड झाल्यानेसर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरांपासून सर्वसामान्यांच्या वाहनांची सातत्याने तोडफोड होत आहे. पोलिस मात्र अशा घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेआहेत.