भोसरीगाव शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भोसरीकरांनी एकमताने बंद करण्याचा घेतला निर्णय

485

 

भोसरी, दि.९ (पीसीबी) – कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भोसरीकरांनी एकमताने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भोसरीगाव शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, शहरात १० मार्चपासून आजपर्यंत २२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बारा बरे झाले आहेत. १० सक्रिय बाधित रुग्णांवर वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत. महापालिकेने खबरदारी म्हणून शहरातील काही भाग सील देखील केला आहे.

 

WhatsAppShare