भूमीपुत्रांना प्राधिकरणाकडून साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याचा प्रयत्न करू – सदाशिव खाडे

172

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमीन संपादित करताना मूळ शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच प्राधिकरणाचे इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्राधिकरणाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी शुक्रवारी (दि. ७) सांगितले.

प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, भाजप प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, अमित गोरखे, प्रवक्ते अमोल थोरात, खाडे यांच्या पत्नी संगिता खाडे, महिला मोर्चा शहराध्यक्षा शैलाताई मोळक, माजी महापौर आर.एस. कुमार, योगेश बहल, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, अश्विनी बोबडे, शर्मिला बाबर, महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव अनुप मोरे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, भीमा बोबडे, यशवंत भोसले, श्रीधर वाल्हेकर, रघुनाथ वाघ, भाजप शहर उपाध्यक्ष विजय शिनकर, दिलीप राऊत, अनुसूचित जाती सेल शहराध्यक्ष मनोज तोरडमल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष सलिम शिकलगार, मंडल अध्यक्ष अण्णा गर्जे आदी उपस्थित होते.

सदाशिव खाडे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडच्या विकासामध्ये ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी प्राधिकरणात आरक्षित झाल्या त्यांना साडेबारा टक्क्यांचा परतावा देण्यासाठी व इतर प्रलंबित प्रश्नांसाठी मी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, स्थानिक खासदार व आमदार या सर्वांच्या सहमतीने माझी या पदावर निवड झाली आहे. प्राधिकरणामार्फत गरीब कामगारांना घरे देण्याची योजना लवकरच तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.”