भूमकर चौकातील मटका अड्ड्यावर छापा; मटका चालविणारा गजाआड

49

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – खुलेआम सुरू असलेल्या भूमकर चौकातील मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. मटका अड्डा चालविणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.

हनुमंत रामप्पा साथीहळ (वय ३९, रा. देवकरवस्ती, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या मटका चालविणाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी विजय बजत्री (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील भूमकर चौकात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी छापा टाकला असता हनुमंत हा कागदावर आकडे घेताना आढळून आला. तसेच त्याच्याकडे मटका घेण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी ११८० रुपये जप्त केले आहेत. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.