भुमकर चौकात ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

162

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) –  ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.१२) दुपारी एकच्या सुमारास मुंबई बंगळूर महामार्गावरील भुमकर चौकात झाला.

रमेश विलास सोंडे (वय ३५,रा. निगडी प्राधिकरण) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास रमेश सोंडे हे त्यांच्या दुचाकीवरुन डांगे चौकाच्या दिशेने जात होते. यावेळी ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेने सोंडे खाली पडून ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कंटेनरचालक स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.