भीमा नदी पात्रात वृध्दाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

54

दौंड, दि. १३ (पीसीबी) – दौंड तालुक्यातील कानगावच्या हद्दीतीतून वाहनाऱ्या भीमा नदीच्या पात्रात एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण विठ्ठल फडके यांनी या घटनेबद्दल माहिती पोलिसांना दिली.  वृद्धाचे वय अंदाजे ७० वर्ष असल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्युची नोंद केली असून अद्याप या वृध्दाची ओळख पटलेली नाही. याविषयी अधिक  माहिती मिळल्यास यवत पोलीस ठाणे ( ०२११९ – २७४२३३) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.