भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ठाण्यातून एकजण ताब्यात

105

ठाणे, दि. २८ (पीसीबी) – भीमा कोरेगावच्या हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेच्या अनुषंगाने हैदराबाद उत्तर प्रदेश ,मुंबई ठाणे येथे पुणे गुन्हे शाखेने ज्या धाडी टाकल्या त्यात आज (मंगळवारी) ठाणे येथील चरईमधून अरुण परेरा याला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) पहाटे पासूनच पुणे पोलिसांनी भीमा कोरेगावच्या हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेच्या अनुषंगाने देशातील विविध ठिकाणी एकाच वेळेस धाड टाकली. पोलिसांनी याप्रकरणी ठाणे येथील चरईमधून अरुण परेरा याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पुस्तके, वह्या आणि लॅपटॉप, पेन ड्राइव हे साहित्य जप्त केले आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. अरुण परेराच्या म्हणण्यानुसार मानवाधिकाराचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केली गेली जात आहे.