भीमा कोरेगाव दंगल प्रकरण: दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापकाच्या घरी पुणे पोलिसांचे छापे

147

दिल्ली, दि. १० (पीसीबी) – एल्गार परिषद संदर्भात संशयित हनी बाबू यांच्या नोएडा येथील राहत्या घरी पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी पोलिसांनी हनी बाबू यांच्या घराची फक्त झडती घेतली आहे आणि काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे.

एल्गार परिषद प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जानेवारी २०१८ रोजी पुण्यालगतच्या भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या हिंसाचारामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पुणे आणि नोएडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक असलेले हनी बाबू यांच्या निवासस्थानी छापा टाकला आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी हा छापा टाकला आहे. यावेळी पोलिसांनी फक्त तपास केला असून कोणत्याही प्रकारची अटकेची कारवाई केलेली नाही. या तपासाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे, त्याचबरोबर जप्त केलेल्या वस्तुंचा पंचनामाही करण्यात आला आहे.