भिशीचे पैसे घेऊन पोबारा झालेल्या सातपुते आरोपींना २५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत वाढ

384

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरात बेकायदा भिशी, सावकारी सुरू असते. कष्टकरी लोकं मोठ्याप्रमाणात पैसे गुंतवतात जून महिन्यात पुष्पा नारायण सातपुते, परशुराम नारायण सातपुते, सागर नारायण सातपुते हे कुंटुंब गेले पाच-सात वर्षे लिलाव भिशी चालवायचे. किमान २०० लोकांचा यात सहभाग होता. परिसरातील नागरिकांना हे लोक १५ – २० टक्के महिना दराने कर्ज देत असतं. भिशी मध्ये गोळा केलेल्या पैशातून त्यांनी गावाकडे प्रचंड गुंतवणूक केली. बरोबर २७ जून ला सकाळी दवाखान्यात जात असल्याचे कारण देत या तिघांनी एक एक करत पोबारा केला. वाकड पोलिसांकडे मिसींग ची तक्रार दाखल केली. मात्र वाकड पोलिसांनी त्यांना ४ महिन्यांनंतर म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. नंतर त्यांना पुणे न्यायालयात २० नोव्हेंबर रोजी हजर करण्यात आलं. त्यांनतर त्यांना २२ नोव्हेंबर पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पुढील तपासासाठी तपासी अंमलदार अवधूत शिनगारे यांनी पुन्हा पोलीस कोठडी मिळावी म्हणून न्यायाधिशाकडे अर्ज दाखल केला. व त्यावर मा. सरकारी वकील आणि मूळ फिर्यादी महेश घाटे आणि समाजसेविका भाग्यश्री अरुण म्हस्के व इतर साक्षीदार यांच्यातर्फे वकील सुरेख सय्यद आणि सहकारी वकील प्रशांत यांनी बाजू मांडली याप्रकरणी आरोपींना पुन्हा २५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आहे. या ठिकाणी पैसे गुंतवणारे सर्व कामगार, शिक्षक, किरकोळ दुकानदार, भाजीपाला, वडापाव विक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला, रोजंदार कर्मचारी आहेत. पिंपरी, चिंचवड, मोशी, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, पुणे, कात्रज, हडपसर, देहूरोड भागातील लोक फसवले गेले आहेत आणि त्यांना न्याय लवकरात लवकर मिळावा अशी मागणी पोलिस मित्र संघटना पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्ष भाग्यश्री अरुण म्हस्के यांनी पोलिसांना केली आहे.

WhatsAppShare