भिवंडीत १४ वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या

336

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर घरात घुसून बलात्कार करुन पाण्याच्या टबमध्ये तिला बुडवून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरात घडली.

भिवंडी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात नराधमाविरूद्ध हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आई-वडील आणि मोठ्या बहिण-भावासह मानकोली परिसरात राहात होती. गुरुवारी सकाळी आई-वडील गोदामात कामावर गेले असता. मुलगी घरात एकटीच होती. घरात कोणी नाही ही संधी साधून नराधमाने घरात घुसून मुलीवर बलात्कार केला. नंतर मुलीची टबमध्ये बुडवून हत्या करुन पसार झाला. भिवंडी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.