भिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण; मयत राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांचे फोटो जाहिर; नागरिकांना माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन

149

पुणे, दि. ८ (पीसीबी) – भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी ला उसळलेल्या जातीय हिंसाचारमध्ये बळी गेलेला राहुल फटांगडे या तरुणाच्या मारेकऱ्यांचे फोटो सीआयडीकडून जाहिर करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी याआधी नगर जिल्ह्यातील पारगाव येथील तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आणखी चार जणांचे छायाचित्र प्रकाशीत केले आहेत. त्यांचा शोध सुरु असून नागरिकांना त्यांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.