भिमाशंकर कुंडात पडून भाविकाचा मृत्यू

91

पुणे, दि. १५ (पीसीबी) – पुण्यीतल बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भिमाशंकर येथील कुंडात पडून एका ४० वर्षीय भावीकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (रविवार) सकाळच्या सुमारास भिमाशंकर येथील मंदिराच्या आवारात घडली.

गुरुदवाल अग्रहरी (वय ४०, रा. उत्तरप्रदेश) असे कुंडात पडून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गुरुदवाल हे आज रविवार त्यांचा भाऊ हेमराज अग्रहरी सोबत भिमाशंकर येथे आले होते. यावेळी गुरुदवाल मंदिराच्या मागच्या बाजूच्या कठड्यावर उभे होते. अचानक कुंडाच्या दिशेने त्यांचा तोल जाऊन ते त्यात पडले. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे त्यांना वाचवण्यात अपयश आले. आखेर स्थानिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. भिमाशंकर पोलिस अधिक तपास करत आहेत.