भिडे, एकबोटेला वाचवण्यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांना अटक केल्याचा एल्गार परिषदेचा आरोप

64

पुणे, दि. ६ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन आणि इतरांना अटक केल्याचा आरोप एल्गार परिषदचे आयोजकांनी आज (बुधवार) पत्रकर परिषदेत केला आहे.

पुणे पोलिसांनी सुधीर ढवळे, रोना विल्सन तसेच सुरेंद्र गडलिंग यांना आज बुधवारी अटक केल्यानंतर एल्गार परिषदेचे आयोजक आणि कबीर कला मंचाच्या कलाकारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती जे एन पटेल आणि निवृत्त न्यायमूर्ती मलिक यांचा आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगाचा अहवाल येण्यापूर्वीच पोलिसांकडून ही कारवाई का केली, असा सवाल परिषदेच्या सदस्यांनी उपस्थि केला आहे. महाराष्ट्र व पुण्यातील आंबेडकर संघटनाची बैठक घेऊन या संघटना आता आंदोलन करणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी आकाश साबळे, ज्योती जगताप एल्गार परिषदेचे अण्य सदस्य उपस्थित होते