भारत सोडण्यापूर्वी अरूण जेटलींची भेट घेतली; विजय मल्ल्याचा गौप्यस्फोट

344

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – भारत सोडण्यापूर्वी तडजोडीसाठी आपण अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट उद्योगपती विजय मल्ल्या यांने आज (बुधवार) केला आहे.    

लंडन येथील वेस्टमिनिस्टर न्यायालयात प्रत्यार्पणाबाबत सुनावणी सुरू आहे. यावेळी मल्ल्या म्हणाला की, बँकेने माझ्या कर्जफेडीसंदर्भातील तडजोडीबाबत प्रश्न उपस्थित केले होते, असे सांगत थकबाकी भरायला आपण तयार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

या सुनावणीदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी विजय मल्ल्याला मुंबईतील ज्या आर्थर रोड कारागृहात ठेवणार आहेत, त्याचा व्हिडिओ सादर केला. दरम्यान,  भारतीय कारागृहांची अवस्था खराब असल्याने आपल्याला भारताकडे सोपवले जाऊ नये, अशी विनंती मल्ल्याने केली होती.