भारत चीन मुद्दा देशहिताशी संबंधित, हे आमच्या घरचे काम नाही – पृथ्वीराज चव्हाण यांचा शरद पवार यांना टोला

26

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – भारत-चीन मुद्दा हा देशहिताशी संबंधित आहे, हे काही आमच्या घरचे काम नाही. त्यामुळे काँग्रेस या प्रश्नावर जनतेच्या भावना मांडणारच. या प्रश्नी आम्ही राजकारण करत नसून सक्षम विरोधकाची भूमिका आम्ही पार पाडत असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या वक्त्तव्यावर आक्षेप घेतला.

पवारांनी नुकतेच राहुल गांधी यांनी चीनप्रश्नी केलेल्या विविध वक्तव्यांचा समाचार घेत इतिहासाचा अभ्यास करत तसेच माहिती घेत टीका करण्याचे सांगत त्यांना सुनावले होते. हे सांगताना पवारांनी इतिहासातील काही प्रसंग आणि आकडेवारीचे दाखलेही दिले होते. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी आज येथे बोलताना पवारांवर टीका केली आहे.

चव्हाण म्हणाले, की आम्ही सक्षम विरोधी पक्षाचे काम करत आहोत. त्यामुळे जनतेच्या मनातील प्रश्नांवर विचारणा करणारच. लोकभावना व्यक्त करणे कुणाला चुकीचे वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे असे सांगत त्यांनी पवार यांच्या वक्त्तव्यावर आक्षेप घेतला.

WhatsAppShare