भारतीय लष्करात भरती न होऊ शकल्याने तरुणाने केली फेसबुक लाइव्ह करुन आत्महत्या

43

आग्रा, दि. १२ (पीसीबी) – पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती न होऊ शकल्याने निराश झालेल्या एका २४ वर्षीय तरुणाने फेसबुक लाइव्ह करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना बुधवारी (दि.११) आग्रा येथील शांतीनगरमध्ये घडली.
मुन्ना कुमार (वय २४, रा. आग्रा, शांतीनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना कुमार बीएससी ग्रॅज्युएट असून आग्रा येथील शांतीनगरमध्ये राहायचा. बुधवारी सकाळी फेसबुकवर एक मिनिट नऊ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले. त्याचा हा व्हिडीओ २७५० जण पाहत होते, पण कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान घटना स्थळावरुन सुसाईड नोट भेटली आहे त्यामध्ये मुन्नाने आपल्या आत्महत्येसाठी आपणच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. भारतीय लष्करात भरती होऊ न शकल्याने तसेच आई-वडिलांची अपेक्षा पूर्ण न करु शकल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे मुन्नाने लिहिले आहे.