भारतीय लष्कराच्या कारवाईत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

123

श्रीनगर, दि. १४ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमधील तंगधार परिसरात सोमवारी रात्री उशिरा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या दोन पाकिस्तानी सैनिकांना भारतीय लष्कराच्या जवानांनी यमसदनी पाठवले. पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. भारतीय लष्कराकडून त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे.

भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेवर कारवाई गतीमान केली आहे. सोमवारी रात्री दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन आणि दहशतवाद्यांकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने प्रत्युत्तरादाखल ही कारवाई केली आहे,’ असे संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात येत आहे.